बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अजय देवगण आणि काजोल. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचे नात अधिक मजबूत आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले असले तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे. काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला २३ वर्षे झाली आहेत. लग्नानतंर काजोलने सिनेसृष्टीतून ब्रेक घेत कौटुंबिक आयुष्याला जास्त महत्त्व दिले. पण काजोलची पहिली पसंती अजय देवगण नव्हे तर दुसरंच कोणीतरी होते.
आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखले जाते. तिचे लाखो चाहते आहेत. काजोलने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने काजोल चांगली ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर तिचा ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली.
पण सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात काजोलला एक अभिनेता प्रचंड आवडत होता. त्याची एक झलक पाहण्यासाठी ती फार आतुर व्हायची. इतकंच नव्हे तर त्या अभिनेत्यामुळेच तिची आणि करण जोहरची ओळख झाली. ते दोघेही एकत्र पार्टीमध्ये त्याला शोधायचे. नुकतंच करण जोहरने याबाबतचा खुलासा केला आहे.
करण जोहरने ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये याबद्दलचा गौप्यस्फोट केला होता. करण जोहरने दिलेल्या माहितीनुसार, “लाखो चाहते असणाऱ्या काजोल मात्र बॉलिवूडच्या खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारवर फिदा झाली होती. काजोलचे सिनेसृष्टीत फार कमी मित्र आहे. तिचे मोजून पाच ते सात मित्र असतील. जेव्हा मी काजोलला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती माझ्यावर खूप हसली होती आणि त्यानंतर मी तिथून निघून गेलो होतो.”
यापुढे तो म्हणाला, “१९९१ मध्ये मुंबईत हिना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ऋषी कपूर आणि जेबा बख्तियार झळकले होते. या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी काजोल ही अक्षयची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होती. तर दुसरीकडे मी त्याला शोधण्यात तिची मदत करत होतो. आम्ही दोघेही मिळून अक्षय कुमारला शोधत होतो. यावेळी त्या दोघांनाही तो तिथे दिसला नाही. पण यानंतर त्या दोघांची घट्ट मैत्री झाली होती, जी आजतागायत कायम आहे.”
जिनिलियाने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली “आज मी…”
दरम्यान त्यानंतर १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते. कजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.