बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. शाहरुख नेहमीच समानतेवर जोर देताना दिसतो. शाहरुखच्या घरात त्याच्या मुलाला मुलीपेक्षा जास्त किंवा कोणता विशेष अधिकार नाही, यावर त्याने उघडपणे सांगितले आहे. शाहरुख त्याच्या मोठ्या मुलाला म्हणजेच आर्यनला घरात शर्टलेस फिरण्याची परवाणगी देत नाही. याबद्दल शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते.
शाहरुखने २०१७ मध्ये ‘फेमिना’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला. शाहरुख घरी असताना आर्यनला नेहमी शर्ट घालायला सांगतो. त्याच्या मते, एखाद्या पुरुषाला घरात असलेल्या आई, बहिण किंवा मैत्रिणींसमोर शर्टलेस राहण्याचा अधिकार नाही.
View this post on Instagram
यावर शाहरुख म्हणाला, जर आपल्या आई, मुलगी, बहिण किंवा मैत्रिणीला कपड्यांशिवाय पाहून आपण अस्वस्थ होत असू. तर, त्या ही तुम्हाला पाहून अस्वस्थ होणार नाही अशी अपेक्षा तुम्ही करु शकतं नाही.” त्याच्या मते याचा संबंध स्तानाशी नाही. एखादी मुलगी घरात जे करु शकतं नाही ते त्याच्या मुलांनी घरी करु नये अशी त्याची इच्छा आहे.
View this post on Instagram
तर, शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांच १९९१ मध्ये लग्न झालं आहे. त्यांना ३ मुलं असून आर्यन, सुहाना आणि अबराम असे त्यांच्या मुलांची नाव आहेत.
आणखी वाचा : वाढत्या वयामुळे होणाऱ्या बदलांबद्दल प्रियांका म्हणते….
दरम्यान, शाहरुख लवकरच ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.