बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेस. टायगर हा लोकप्रिय अॅक्शन हिरोपैकी एक आहे. २०१४ मध्ये हिरोपंती या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तुम्हाला माहितीये या अॅक्शन हीरोचे आजोबा हे रियल लाइफ हीरो होते.
आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ
टायगर श्रॉफची आई आयशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो टायगरचे आजोबा म्हणजेच आयशा यांचे वडील आहेत. त्यांचे नाव रंजन दत्त आहे. तर हे फोटो दुसरे विश्व युद्धातले आहेत. “टायगरचे आजोबा हे Tiger Moths Plane उडवण्याचे प्रशिक्षण घेत होते. ते त्यावेळी १८-१९ वर्षांचे होते तेव्हा ते दुसऱ्या महायुद्धात लढले होते. खरे धैर्य आणि खरे शौर्य. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. जय हिंद”, असे कॅप्शन आयशाने दिले. आयशा यांनी त्यांच्या वडिलांचे ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. रंजन दत्त यांच्यासोबत आणखी काही फायटर पायलेट दिसत आहेत.
आणखी वाचा : 50 Shades Of Gray: “मला बेडवर फेकले अन्…”, इंटिमेट सीन शूटचा डकोटाने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव
आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…
टायगर लवकरच ‘हिरोपंती २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो तारा सुतारियासोबत दिसणार आहे. तर त्यानंतर ‘गणपत’ या चित्रपटातही टायगर दिसणार असून यात क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यंदा ख्रिस्मसमध्ये प्रदर्शित होणार आहे.