प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. सध्या शेर शिवराज हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडी या शिवराज अष्टकाच्या माध्यमातून समोर येत आहे. याद्वारे आठ विविध चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड हे तीन चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ काल शुक्रवारी (२२ एप्रिल) प्रदर्शित झाला आहे. अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. फक्त दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतंच ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई जाहीर केली आहे. तरण आदर्श यांन दिलेल्या माहितीनुसार, शेर शिवराज या चित्रपटाने एका दिवसात १.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच प्रेक्षकांचा वाढत प्रतिसाद पाहून हा चित्रपट लहान चित्रपटगृहातून मोठ्या चित्रपटगृहातील स्क्रीनवरही प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरला आहे.
“…यापुढे कुठलीही अडचण आली तरी मला सांगा”, ‘धर्मवीर’ आनंद दिघेंच्या आठवणीत आदेश बांदेकर भावूक
दरम्यान दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता शेर शिवराज हा चौथा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या चांगलाच हिट ठरताना दिसत आहे.