बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. १९९० साली काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांचं पलायन यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळताना दिसत आहे. मात्र एक गट असाही आहे जे या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे. अशात आता विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी भोपाळी म्हणजे होमोसेक्शुअल असं म्हटलं आहे. यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचं विवेक अग्निहोत्री यांच्याबाबतचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सध्या विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका मुलाखतीची क्लिप आहे. या व्हिडीओमध्ये ते भोपाळी लोकांबद्दल बोलताना दिसत आहे. ते म्हणतात, ‘मी भोपाळमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. पण मी भोपाळी नाही आहे. कारण भोपाळी खूप वेगळे असतात. मी तुम्हाला कधीतरी खाजगीत सांगेन. कोणत्याही भोपाळीला विचारा, भोपाळीचा अर्थ होमोसेक्शुअल आहे, नवाबी शौक असणारा.’

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

आणखी वाचा- शरद पवारांच्या नातवाचा प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

विवेक अग्निहोत्री यांचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर करताना दिग्विजय सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘विवेक अग्निहोत्रीजी हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. हा भोपाळच्या सामान्य रहिवाशाचा अनुभव नाही. मी ७७ पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही राहिलात तरी ‘संगतीचा प्रभाव असतोच.’

आणखी वाचा- तब्बल ३ महिन्यांनंतर समोर आलं विकी- कतरिनाच्या लग्नाचं धक्कादायक सत्य, विवाहित असूनही…

दरम्यान दिग्विजय सिंह यांच्या या ट्वीटवर विवेक अग्निहोत्री यांनी अद्याप उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे आता यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात अनुपम खर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader