‘तनु वेड्स मनु रिटर्नस्’ आणि ‘पिकू’ चित्रपटांचे यश साजर करण्यात व्यस्त असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत आणि दीपिका पदुकोण ‘दिल धडकने दो’ चित्रपटाच्या स्क्रिनींगच्या निमित्ताने एकत्र होत्या. दोघींमधील कथीत गैरसमज नाहीसे झाल्याची चर्चा यावेळी रंगत होती.
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणा-या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाचे स्क्रिनींग मुंबईतील यश राज स्टुडिओमध्ये बुधवारी रात्री आयोजित करण्यात आले होते. रणवीर सिंग उपस्थित राहू शकणार नसल्याने त्याची कमी भासू नये यासाठी दीपिकाला यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्ताने कंगना आणि दीपिका एकाच छताखाली आल्या होत्या. दोघींच्या चेह-यावर हास्यभाव असले तरी दोन प्रतिस्पर्धी अभिनेत्री एकाच छताखली आल्याने कार्यक्रमस्थळी अस्वस्थता जाणवत होती. असे असले तरी कंगना आणि दीपिका एकमेकींशी मोकळपणाने आणि सहजतने वागत होत्या. त्यामुळे या दोघींमध्ये एकमेकींबद्दल गैरसमज असल्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.
मिडीयानेच दोघींमध्ये गैरसमज असल्याचे चित्र निर्माण केल्याचे सांगत झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्याबद्दल कंगना आणि दीपिकाने आनंद व्यक्त केला.
‘दिल धडकने दो’ च्या स्क्रिनींग निमित्त कंगना आणि दीपिका एकत्र
'तनु वेड्स मनु रिटर्नस्' आणि 'पिकू' चित्रपटांचे यश साजर करण्यात व्यस्त असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत आणि दीपिका पदुकोण 'दिल धडकने दो' चित्रपटाच्या स्क्रिनींगच्या निमित्ताने एकत्र होत्या...
First published on: 04-06-2015 at 08:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dil dhadakne do screening brings deepika padukone kangana ranaut together