अमेय वाघ हे नाव आणि चेहरा आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून हा चेहरा आपल्याला भेटत असतो. बोलके डोळे हे सर्वसाधारण अमेयची वैशिष्ट्य. मल्याळम सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘शटर’ या चित्रपटातून अमेय आपल्या भेटीला येतोय. या सिनेमात अमेयने रिक्षा चालकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. अमेयच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा आपण आतापर्यंत अनेक चित्रपटातून पहिल्या आहेत. दारू सर्वाथाने सगळ्यात वाईट व्यसन. दारूच सेवन केल्यामुळे आपलं काय नुकसान होतं हे अमेयने रिक्षा चालकाच्या भूमिकेतून साकारलं आहे.
प्रकाश बरे हे सिनेमाचे निर्माते असून व्ही. के. प्रकाश यांनी सिनेमाच दिग्दर्शन केल आहे. मंगेश कांगणे आणि अश्विनी शेंडे यांनी सिनेमाची गीते लिहिली असून पंकज पडघन यांनी या गीतांना लयबद्ध केल आहे. के. के. मनोज यांनी सिनेमाच छायाचित्रिकरणाची धुरा सांभाळली आहे. बहुचर्चित असलेला हा सिनेमा ३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेयने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहे, त्यामुळेच शटरमधल्या त्याच्या भूमिकेची उत्सुकता लागली आहे.

Story img Loader