पाकिस्तानच्या पेशावर शहरात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे घर होते. पण आता हे घर जमीनदोस्त झाले आहे. हे घर कधीही पडू शकतं अशा बातम्या याआधीही आल्या होत्या. २०१३ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घराला राष्ट्रीय संपत्ती घोषीत केले होते. पण पाकिस्तान सरकारही हे घर पडण्यापासून वाचवू शकले नाही. दिलीप कुमार यांचा जन्म १९२२ मध्ये पेशावरमध्ये झाला होता. त्यांचे खरं नाव यूसुफ खान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Toilet Ek Prem Katha: पंतप्रधानांनीही केली अक्षयच्या ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ची प्रशंसा

यूसुफ यांचे वडील लाला गुलाम सरवर हे १९३० मध्ये पेशावरहून मुंबईला राहायला आले. पाकिस्तानमध्येही दिलीप कुमार यांचे चाहते आहेत. त्या घराच्या इथे एखादे संग्रहालय बनवावं अशी तेथील लोकांची इच्छा होती. दिलीप यांनी १९८८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी या घरालाही भेट दिली होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वात आधी तिथल्या जमिनीला नमन केले होते.

यावेळी त्यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळाही दिला. यानंतर १९९७ मध्ये त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘निशान ए इमिताज’नेही सन्मानित करण्यात आले होते. पाकिस्तान सरकार या घराच्या संवर्धनासाठी काही योजनाही आखत होती. पण त्याआधीच हे घर कोसळले. तसं पाहायला गेलं तर दिलीप कुमार हे काही एकमेव बॉलिवूड स्टार नाहीत ज्यांचं पाकिस्तानमधील पेशावरशी नातं आहे. पृथ्वीराज कपूर, विनोद खन्ना आणि शाहरुख खान या सुपरस्टार्सचेही या शहराशी नाते आहे. ९४ वर्षीय दिलीप कुमार हे गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहेत.

इम्तियाजमध्ये शाहरुखला दिसते यश जोहर यांची झलक

गेल्या काही वर्षांमध्ये दिलीप कुमार यांना बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्यांच्या चाहत्यांच्या प्रार्थना नेहमीच त्यांच्यासोबत असतात.