ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आजारी असून त्यांना न्युमोनिया झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यांच्यावर सध्या उपचार करण्यात येत असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यास सांगितले आहे. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दिलीप कुमार यांना न्युमोनिया झाला असून डॉक्टरांनी त्यांना घरीच आराम करण्यास सांगितले आहे. देवाच्या कृपेने बाकी सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा,’ असे ट्विट करण्यात आले आहे.

https://twitter.com/TheDilipKumar/status/935528739928031232

याआधी ऑगस्टमध्ये मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी चाहत्यांपासूनच अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumar diagnosed with pneumonia and advised to take proper rest by the doctors