दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात साएशा सहगल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. साएशा तिच्याहून वयाने १७ वर्षांनी मोठा असलेला दाक्षिणात्य अभिनेता आर्या याच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. येत्या ९ आणि १० मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साएशाने आर्यासोबत एका दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं होतं. ‘गजनीकांत’ असं त्या चित्रपटाचं नाव असून त्याच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या दोघांच्या नात्याला कुटुंबीयांकडूनही हिरवा कंदील मिळाला. हैदराबादमध्ये साएशा आणि आर्याचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये मित्रपरिवार आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे.

वाचा : आमिरसोबतच्या नात्यावर फातिमा म्हणते, ‘मी हरामी असती तर..’

साएशा ही अभिनेता सुमित सहगल आणि अभिनेत्री शाहिन बानो यांची मुलगी आहे. अभिनयापासून भिन्न अशा वातावरणात राहिलेल्या साएशाने अभिनयातच करिअर करायचं ठरवलं होतं. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. तर ‘शिवाय’ या अजय देवगणच्या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.