ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना न्यूमोनियाच्या उपचारासाठी शनिवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप कुमार यांचा कफ वाढला होता, थंडीचाही त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले असल्याचे लिलावती रुग्णालयाचे डॉ. जलिल परकार यांनी सांगितले.दिलीप कुमार यांच्यावर न्यूमोनियासाठी उपचार सुरू असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले नाही, असेही डॉ. परकार यांनी स्पष्ट केले. ९१ वर्षीय दिलीप साबना याआधीही सप्टेंबर महिन्यात ह्रदयविकाराचा हलका झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.