भारत भेटीवर आलेल्या पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद महमुद कसुरी यांनी बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार व त्यांच्या पत्नी सायरा बानो यांची भेट घेत त्यांना भारतात प्रकाशित करण्यात आलेल्या ‘नायदर हॉक नॉर अ डोव्ह’ या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून दिली. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दिलीप कुमार यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी कुर्शिद यांनी तासभर घेतलेल्या भेटीत अनेक आठवणी जागवल्या, त्यातच त्यांनी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानला दोन वेळा गुप्तपणे भेट दिल्याची माहिती दिली आणि त्यांच्या भेटीचे प्रसंग पुस्तकात अधोरेखित केले असल्याचे सांगितले. दिलीप कुमार यांच्या भेटीचा उद्देश हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा होता त्याचप्रमाणे ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी भारत पाकिस्तानदरम्यान सलोख्याचे संबंध प्रस्थापित करेल, असेही कसुरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी देखील त्यांच्यासोबत होते.
‘दिलीप कुमार यांनी गुप्तपणे पाकिस्तानला भेट दिली होती’ – कसुरी
यावेळी ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी ही त्यांच्यासोबत होते.
Written by रत्नाकर पवार
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-10-2015 at 12:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumar secretly visited pakistan twice khurshid kasuri