ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा ९२ वा वाढदिवस त्यांनी गुरूवारी आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा केला. छातीत संसर्ग झाल्यामुळे गेला आठवडाभर ते लिलावती रुग्णालयात उपचार घेत होते. दिलीप कुमार यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात थांबण्याची गरज नव्हती. म्हणून, त्यांना रु ग्णालयातून घरी सोडले आहे. त्यांची नेहमीची औषधे यापुढे सुरू राहतील, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी दिली.
गेल्या आठवडय़ात दिलीप कुमार यांना सर्दीमुळे छातीत कफ साठून श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यांना उपचारासाठी ताबडतोब लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळी रुग्णालयातून बाहेर पडलेल्या दिलीप कुमार यांचे त्यांच्या चाहत्यांनी जंगी स्वागत केले. हिंदी चित्रपटसृष्टीवर सहा दशके अधिराज्य गाजवणारे अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचा गुरूवारी ९२ वा वाढदिवस होता.
‘दिलीप कुमार’ शिष्यवृत्ती
८० च्या दशकात दिलीप कुमार यांच्याबरोबर यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘दिलीप कुमार’ नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली.

Story img Loader