दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे पाकिस्तानमधील घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोडकळीस आलेल्या या मालमत्तेस राष्ट्रीय वारसा घोषित करण्याचे आदेश दिले. शरीफ यांच्या या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यास चालना मिळू शकते.
दिलीप कुमार यांच्या घराला राष्ट्रीय वारसा घोषित केल्यानंतर सरकारने त्याचे रुपांतरण संग्रहालयामध्ये करण्याचा विचार केला आहे. दिलीप यांचे घर पेशावर येथील प्रसिद्ध किसा खावानी बाजार येथे आहे. यासंबंधित समारंभासाठी दिलीप कुमार व त्यांच्या कुटूंबियांना आमंत्रित करण्यात येणार आहे. युसूफ खान म्हणजेच दिलीप कुमार यांचा जन्म १९३० साली पेशावर येथे झाला होता.
दिलीप कुमार यांचे पाकिस्तानमधील घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित
दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे पाकिस्तानमधील घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
First published on: 14-07-2014 at 11:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip kumars ancestral home in pakistan declared national heritage