जागतिक पितृदिनाच्या पाश्र्वभूमीवर, पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनविवि फाऊंडेशन आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे १५ जून रोजी सायंकाळी सहा वाजता ‘माझा बाबा’ मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात
‘गणवेश’ चित्रपटांतील दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, दिग्दर्शक अतुल जगदाळे यांच्यासह अन्य कलावंत उपस्थित राहणार आहेत.
या बाबतची माहिती सनविविचे अध्यक्ष धीरज बच्छाव यांनी दिली. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम होईल. आयुष्यभर आपल्या कुटूंबासाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बाप सतत कष्ट करून कुटूंबाचे पालन पोषण करत असतो. कुटूंबाच्या जबाबदारी बरोबर तो सामाजिक जबाबदारी देखील पार पाडतो. कुटूंबातला एक सदस्य, कुटूंबासाठी नेहमीच धडपडणारा, आपल्या मुला-बाळास जगाच्या पाठीवर कणखर बनवण्यासाठी सातत्याने भूमिका बदलणारे ‘वडिल’ हे नाते काळानुरूप वेगवेगळ्या नावारूपात बांधले गेले. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गणवेश चित्रपटाच्या निमित्ताने मुलासाठी झटणाऱ्या बाबांविषयी चित्रपटातील कलाकार मंडळी नाशिककरांशी मुक्त संवाद साधणार असून आपल्या बाबांविषयी आठवणींनी उजाळा देणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक चिन्मय खेडेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी धीरज बच्छाव (९९६०३ ३८८६६) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader