दर्जेदार मनोरंजनाचं नवं पर्व सुरू करताना नव्या वर्षाच्या प्रारंभाला ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या दोन नव्या मालिकांची खास पर्वणी झी मराठी आपल्या रसिकांसाठी घेऊन येतेय. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या लोकप्रिय नाटकावर आधारित याच नावाची मालिका आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत तर त्यांच्या जोडीला आहेत लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. येत्या १८ जानेवारीपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ तर १० वा. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असलं तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसं प्रेम आहे तसंच या नात्यात एक खट्याळपणासुद्धा आहे. या वयातही राजाभाऊ मनाने अगदी तरुण आहेत आणि या मुद्यावरुन दोघांमध्ये प्रेमळ खटकेही उडतच असतात. राजाभाऊंचा हट्ट की मालतीने त्यांना तरुण म्हणावं आणि मालतीची इच्छा अशी की राजाभाऊंनी हा अट्टाहास सोडावा. या दोघांच्या याच खुसखुशीत नात्याची गंमत या मालिकेतून बघायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip prabhavalkar sukanya mones new serial on chuk bhul dyavi ghyavi
First published on: 14-01-2017 at 14:27 IST