टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर आजवर अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत छोट्या पदड्यावर स्वत:ची ओळख निर्माण केलीय. दिलजीत तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्तेत आली आहे. सिंगल मदर असलेली दिलजीत सध्या आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासोबतच फिटनेसकडे देखील लक्ष देताना दिसत आहे. नुकताच एका जाहिरातीमध्ये तिचा फिट अंदाज पाहायला मिळालाय.
दिलजीतने एका शिमरी गाऊनमधील तिचा बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अनेकांनी दिलजीतने फिटनेससाठी मोठी मेहनत घेतली असल्याचं म्हणत तिचं कौतुक केलं. तर काहींनी मात्र एका वेगळ्या मुद्द्यावरून तिच्यावर निशाणा साधला. पिंकवीलाशी बोलताना दिलजीत म्हणाली, “मला चांगलं आठवतयं की मी पतीपासून विभक्त झाल्यानंतर माझं वजन कमी झालं होतं. मात्र लोकांनी माझ्या या ट्रान्फॉर्मेशनचं श्रेय माझ्या ब्रेक-अपला दिलं होतं. त्यांना वाटलं मला एक मुद्दा सिद्ध करायचा आहे. त्यावेळी मी आई झाले होते आणि नंतर हळूहळू माझं गरोदरपणातील वजन मी कमी केलं होतं.” असं ती म्हणाली.
KBC 13: जेव्हा बिग बींना विनातिकीट प्रवास करताना टीसीने पकडलं होतं; शेअर केला धमाल किस्सा
पुढे या मुलाखतीत दिलजीत म्हणाली, “बऱ्याचदा लोक असं गृहित धरतात की आपण इतरांना खूश करण्यासाठी किंवा कुणासाठी तरी गोष्टी करत असतो. मात्र आता मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे की मला लोकांना स्पष्टीकरण देणं गरजेचं वाटत नाही.” असं म्हणत दिलजीतने प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय.
तर करोना माहामारीच्या काळातही फिटनेसकडे पुरेपुर लक्ष दिल्याचं ती म्हणाली. मला माझ्या मुलासाठी एक फिट आई व्हायचंय. त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी एन्जॉय करण्यासाठी मला तंदुरुस्त आणि निरोगी राहायाचंय.” असं दिलजीत म्हणाली.
‘कैसा ये प्यार है’, ‘सपना बाबुका बिदाई’, ‘ससुराल सिमर का’ अशा अनेकक मालिकांमधून दिलजीत झळकली आहे. ‘कुलवधू’ मालिकेतील नियती ही तिची भूमिका अधिक गाजली होती. याच मालिकेवेळी दिलजीत आणि अभिनेता शालीन भनोट यांची भेट झाली होती. २००९ सालामध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र २०१५ सालामध्ये दोघं विभक्त झाले. दिलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केले होते.