पुलवामामधला भ्याड दहशतवादी हल्ला, भारतानं जैश- ए- महम्मदला दिलेलं प्रत्युत्तर , भारत पाकिस्तानमधली तणावपूर्ण स्थिती पाहता अभिनेता दिलजित दोसांझनं आपला कार्यक्रम रद्द केला आहे. दिल्लीतील मादाम तुसाद संग्रहालयात दिलजितचा वॅक्स स्टॅचू उभारण्यात आला आहे. याचा अनावरण सोहळा गुरुवार (२८ फेब्रुवारी) रोजी पार पाडणार होता. मात्र दिलजितनं हा सोहळा रद्द केला आहे.

देशाच्या संरक्षणासाठी आपले सैनिक प्राणांची बाजी लावत आहेत आपण जवानांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. देशातील सध्याची तणावपूर्वक स्थिती पाहता मी पुतळ्याचं अनावरण रद्द करत आहे अशी माहिती दिलजितनं ट्विट करत दिली आहे.

हा अनावरण सोहळा परिस्थिती निवळल्यावर पार पडेल अशीही माहिती दिलजितनं दिली. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुखरूप वापसीसाठीही दिलजितनं प्रार्थना केली आहे.

‘सुरमा’, ‘उडता पंजाब’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटात दिलजितनं काम केलं आहे.

Story img Loader