सलग २० वर्षे मराठा मंदिर येथे दाखविला जात असलेला आणि बॉलीवूडमध्ये आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या चित्रपटाचे पर्व अखेर संपणार आहे. शाहरुख आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या रोमॅण्टिक चित्रपटाला मराठा मंदिर अलविदा करणार आहे.
‘डीडीएलजे’ म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आतापर्यंत हा चित्रपट मराठा मंदिरमध्ये दाखवला जात होता. परंतु, आता २० वर्षानंतर या चित्रपटाचे खेळ बंद करण्यात येणार आहे.
यासंबंधी अधिक माहिती देताना मराठा मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक मनोज देसाई यांनी सांगितले की, ९०० आठवडे चालल्यानंतर हा चित्रपट आम्ही आणि यशराज प्रॉडक्शनने १००० आठवड्यांपर्य़त हा चित्रपट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. १२ डिसेंबर २०१४ रोजी चित्रपटाचे एक हजार आठवडे पूर्ण होत आहेत. सध्या आम्ही यशराज प्रॉडक्शनच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहे. जेणेकरुन आम्ही हा चित्रपट १००० आठवडे चालवण्याचा अंतिम निर्णय घेऊ शकू. पण त्यांच्याकडून काही उत्तर न आल्यास आम्ही हा चित्रपट कायमचा बंद करणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(छाया सौजन्यः बॉलिस्पाइस डॉट कॉम)

(छाया सौजन्यः बॉलिस्पाइस डॉट कॉम)