बॉलीवूड चित्रपटांना हळूहळू पाकिस्तानमध्येही महत्त्व मिळत असून, तेथेही हिंदी चित्रपट चांगली कमाई करत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ चित्रपटाची प्रसिद्धी पाकिस्तानी कार्यक्रमांमध्ये करण्यात येणार आहे.
शाहरुख, काजोल, वरुण आणि क्रिती हे सर्व मुख्य कलाकार याकरिता दुबईत दाखल झाले आहेत. सकाळच्या वेळेत दाखविल्या जाणा-या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाइस्ता लोधी आणि सनम जंग हे करतील. शाहरुख आणि काजोल हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे पाकिस्तानमध्येही चाहते आहेत. ‘दिलवाले’च्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाकडून खूप अपेक्षा केल्या जात असल्यामुळे आम्ही कार्यक्रमाचा विशेष भाग दुबईत करण्याचे ठरविले, असे हम वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले. हम वाहिनीवर १७ डिसेंबरला ‘जागो पाकिस्तान जागो’ आणि ‘सितारे की सुबह’ या कार्यक्रमांमधून शाहरुख-काजोल चित्रपटाची प्रसिद्धी करणार आहेत आहे.
प्रमुख वितरक नदीम मांडवीवाला यांनी सांगितले की, बहुप्रतिक्षित ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे. असे असतानाही ‘दिलवाले’ला लोकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटासाठी कराची आणि लाहोर येथील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी रेकॉर्ड होईल अशी मोठ्या प्रमाणात आगाऊ तिकीट खरेदी केली आहे.

Story img Loader