सध्या चित्रपटप्रेमींमध्ये ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची प्रचंड चर्चा सुरू आहे . यापैकी ‘बाजीराव मस्तानी’ला पुणे शहरात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला असला तरी पहिल्या दिवशी या चित्रपटाने ११ कोटींची कमाई करण्यात यश मिळवले आहे. कालच्या जोरदार विरोधानंतरही पुण्याच्या बहुतेक चित्रपटगृहांमध्ये आज बाजीराव मस्तानीचे शो हाऊसफुल्ल असलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, राज्याच्या विविध भागांमध्ये ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांना प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र, तरीही बॉक्स ऑफिसवर पहिल्यादिवशी ‘दिलवाले’ ‘बाजीराव मस्तानी’वर सरशी साधताना दिसला. ‘दिलवाले’ला शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर तब्बल ७० टक्के ओपनिंग मिळाले तर बाजीराव मस्तानीला ३० टक्केच ओपनिंग मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा