सिनेमाच्या जगात छोट्या-छोट्या प्रसंगातही गम्मत घडते. ‘माझ्या नव-याची बायको’ या सामाजिक कौटुंबिक चित्रपटातील प्रेमगीताच्या नृत्य दिग्दर्शकाबाबत तसेच झाले. भरत जाधवसोबत या युगल गीतामध्ये दीपाली सय्यदने रंग कसा भरायचा याचे मार्गदर्शन बॉबी सय्यद या दिपालीच्या पतीनेच दिले. अर्थात, हा सगळा प्रेमाचा अभिनय असल्याने या पती-पत्नीने या कामाचा भरपूर आनंद घेतला.
दीपाली सय्यद याबाबत सांगत होती, काही वर्षापूर्वी बॉबीच्याच नृत्य समूहात मी एक हौशी नर्तिका होते, सुरूवातीच्या दिवसात मी बॉबीला घाबरत असल्याने मागे-मागे राहणे पसंत करायचे. काही दिवसांनी आमचे एकमेकांवर प्रेम जडले आणि मग आम्ही लग्नदेखिल केले. तेव्हापासून मला बॉबीच्या नृत्यदिग्दर्शनाची शैली माहित असल्याने या चित्रपटासाठी युगल गीत साकारणे सोपे गेले. आता गाणे पडद्यावर पाहचाही वेगळा आनंद मिळतोय, असे देखिल दीपाली म्हणाली.
या चित्रपटात स्मिता गोंदकर, विजय पाटकर यांच्याही प्रमूख भूमिका आहेत.

Story img Loader