टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेल्या कपल्सपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम. दीपिका आणि शोएब सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असतात. दीपिकाचं स्वत:च यूट्यूब चॅनल असून या माध्यामातून दीपिका आणि शोएब चाहत्यांशी संवाद साधत असतात. नुकताच एक व्हिडीओ शेअर करत दीपिकाने ट्रोल करणाऱ्यांना चांगलचं सुनावलं आहे.
काही नेटकऱ्यांनी शोएब आणि त्याच्या कुटुंबियांवर टीका केली आहे. यावर दीपिकाने संतप्त प्रतिक्रिया दिलीय. शोएबचे वडिल काही दिवस रुग्णालयात दाखल होते. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन आठवड्यांनंतर शोएबचे वडील रुग्णालयातून घरी परतले आहेत.दरम्यान वडील घरी परतल्यानंतर दीपिका आणि शोएबने त्याना अधिक विश्रांती मिळावी यासाठी स्वत:ची बेडरुम दिली असून दोघेही गेस्टरुममध्ये शिफ्ट झाले आहेत. यानंतर शोएबने दीपिकाच्या प्रायव्हसीचा विचार केला नाही असं म्हणत अनेकांनी त्याच्यावर टीका केली.
पहा फोटो: जेव्हा मिस अफगाणिस्तान स्पर्धेत मॉडेलने बिकिनी परिधान करण्याचं केलं होतं धाडस!
शोएबच्या वडिलांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या सेवेत दीपिका गेल्या काही दिवसांपासूीन व्यस्त आहे. यावरून नेटकऱ्यांनी ” एका अभिनेत्रीला मोलकरीण बनवलं” अशी टीका शोएबवर केली आहे. यावरूनच दीपिका चांगलीच संतापली आणि तिने नेटकऱ्यांना सुनावलं. घरात काम करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना दीपिकाने एक संतप्त सवाल विचारला आहे. “घरात काम करणाऱ्या तुमच्या आईसाठी तुम्ही हाच शब्द वापरता का?” असा सवाल तिने केलाय. तर शोएबच्या वडीलांना बेडरुम देण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ती म्हणाली,”तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला हवी. ते आमचे वडील आहेत.” इतर कामांसोबत घरही सांभाळत असल्याचा अभिमान असल्याचं दीपिका म्हणाली आहे. माझं सासरचं कुटुंब माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम करतं. त्यामुळे त्यांच्यासाठी घराच्या बाहेर गाडीत झोपण्याची वेळ आली तरी आम्ही ते करू असं दीपिका म्हणाली.
तसचं कामाच्या बाबतीत सांगताना दीपिका म्हणाली, “मी अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे आता मी काम कमी करून माझ्या घरावर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा मी निवडलेला पर्याय आहे. माझ्या कपड्यांवरूनही मला प्रश्न विचारले जातात. मात्र ही माझी आवड आहे. अभिनेत्रींने कायमच तोकडे कपडे परिधान करावे असं कुणी म्हंटलं आहे.” असं म्हणत दीपिकाने संताप व्यक्त केलाय.