मराठी चित्रपटसृष्टीचे आता अच्छे दिन आले आहेत असं म्हणायल हरकत नाही. असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे आता मराठीमध्येही उत्तमोत्तम कलाकृती तयार होत आहे. उत्तम कथेवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. इतकंच नव्हे तर ऐतिहासिक चित्रपटही प्रेक्षकांना भूरळ घालत आहेत. मराठी चित्रपटांना मिळत असलेलं यश खरंच कौतुकास्पद आहे. आता असाच एक उत्तम कथा असणारा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव आहे ‘उनाड’. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बाजी मारली आहे. चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ( Zlin International Film Festival) युवा विभागाच्या फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ‘उनाड’ची निवड झाली आहे. ही खरंच मराठी चित्रपटासाठी आनंदाची बातमी आहे असं म्हणता येईल.

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती दिली. “ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे.” असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उनाड’ ही कथा हर्णे किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या तीन तरुणांची आहे. शुभ्या, बंड्या आणि जमील हे तीन मित्र गावात फक्त फिरत असतात. आयुष्यात पुढे काय केलं पाहिजे त्याचा विचार देखील ही मुलं करत नाहीत. अशा मुलांना गावातील लोकंही उनाड म्हणून बोलू लागता. आणि मग त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

आणखी वाचा – नवरी नटली! शिवानीच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी, पाहा हा खास व्हिडीओ

जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर यांनी केली आहे. तसेच आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव हे कलाकर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.