अभिनेता रणबीर कपूर सध्या चर्चेत आहे त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीपासूनच चांगली कमाई केली होती. रणबीरचा आधीचा चित्रपट ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. रणबीर कपूरने एका कार्यक्रमात कबूल केलं की चित्रपटाच्या कथानकामध्ये फारसा काही दम नव्हता. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला सुरवातीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने तब्बल १० वर्ष मेहनत घेतली होती.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान चित्रपटाची टीम अनेक ठिकाणी फिरले आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला की ‘या चित्रपटासाठी मी माझ्या आयुष्याची १० वर्ष दिली आहेत. गेल्या दहा वर्षात मी कोणतेच इतर काम केले नाही फक्त या चित्रपटाचा विचार करत होतो. रणबीरने या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही. हा चित्रपट आपल्या स्वतःच्या जिद्द आणि वैयक्तिक त्यागातून बनवला गेला आहे. रणबीर या चित्रपटात एक स्टार म्हणून नाही, ब्रह्मास्त्रच्या निर्मितीसाठी त्यांनी काहीही घेतले नाही. आणि मला मान्य आहे की त्याच्याशिवाय आम्ही हा चित्रपट बनवू शकलो नसतो’.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पुन्हा झळकणार एकत्र, ‘या’ चित्रपटात शेअर करणार स्क्रीन, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

पहिल्या भागाला मिळालेले यश बघता आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पुढील भागाची घोषणा केली आहे. इंडीयन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला, ‘मी आता फक्त काहीच गोष्टी चित्रपटाबद्दल सांगू शकतो. दुसऱ्या भागात कथा कशा पद्धतीने दाखवायची याबद्दल आमच्या संकल्पना स्पष्ट आहेत. अयान मुखर्जीच्या मते ब्रह्मास्त्रचा पुढील भाग हा पहिल्या आणि तिसऱ्या भागाची सांगड घालणारा असेल’.

या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, नागार्जुन अशी मोठी स्टारकास्ट आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ७ मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत.अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत या चित्रपटाने यावर्षी सर्वात जास्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या ‘भुलभुलैय्या २’ ला मागे टाकले आहे.परदेशातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Story img Loader