दिग्दर्शक चार्ली मॅक्डॉवेल याच्या ‘डिस्कव्हरी’ चित्रपटातले जग साधारण नाही, याची कल्पना त्याच्या पहिल्या काही क्षणांमधूनच होते. मृत्यूपश्चात जग हा कथेचा गाभा असणाऱ्या या विज्ञानपटाची संकल्पना कित्येक चित्रपटांनी शिळी केली आहे. बॉलीवूडच्या ड्रामोत्कट जगात ‘झुक गया आसमान’पासून ते ‘कर्ज’पर्यंत कितीतरी अभिजात ‘मैलाची दगडे’ आहेत. (मुळात आपल्याकडे दरएक सिनेमा पाहून प्रेक्षकांचा बौद्धिक पूनर्जन्मच होतो.) अन् बॉलीवूडसारखीच बुद्धी खुंटीला लटकावून मनरंजक अमेरिकी भूत-माणूसपटांचीही (जस्ट लाइक हेवन, घोस्ट) यादी छोटी नाही. असे असतानाही हॉलीवूडमध्ये दरएक टप्प्यात माणसाच्या मर्त्यपणाचा वैचारिक पातळीवर अभ्यास करणारे सिनेमे आले आहेत. वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून जीवन आणि मृत्यू यांच्या मधल्या रेषेवर जाऊन तेथला अनुभव गोळा करण्याचा जिवघेणा खेळ रचणारा ‘फ्लॅटलायनर्स’ (१९९०), आत्महत्येनंतरच्या विचित्र जगात गेल्यानंतर व्यक्तिरेखांना आयुष्यावर सातत्याने बोलायला लावणारा ‘रिस्टकटर्स : ए लव्हस्टोरी’ (२००६) ही त्यातली सर्वात लखलखीत उदाहरणे. या चित्रपटांचा हेतू निव्वळ मनोरंजनाचा नाही, तर त्या जोडीला अध्यात्मापासून ते तत्त्वज्ञान, विज्ञानाची चिरफाड साधत प्रेक्षकाला अस्वस्थ करण्याचाही आहे. या पंगतीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डिस्कव्हरी’ या चित्रपटाला आदराने बसविता येऊ शकेल. ‘डिस्कव्हरी’ची संकल्पना शिळी असली, तरी मांडणी अनेक नव्या गोष्टी देऊ पाहणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा