रणबीर कपूर-आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा होत आहे. नुकताच प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पाहिला. परंतु, चित्रपटाचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना फार प्रयत्न करावे लागले. याबद्दल आलेला अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट पाहिल्यानंतर हंसल मेहता यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “मला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट आवडला. परंतु, रात्रीच्या शोचं तिकिट न मिळाल्यामुळे ६०-७० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपटगृहात सकाळचा शो पाहिला. या अनुभवानेही मला आनंद मिळाला. चित्रपटाच्या नंतरच्या शोसाठीही चित्रपटगृहात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दुसरा भागही नक्कीच रोमांचक असेल”, असं म्हटलं आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

हेही वाचा >> Brahmastra Box Office Collection day 3 : ‘ब्रह्मास्त्र’ने जमवला १२५ कोटींचा गल्ला; रणबीर कपूरसाठी ठरला बिग ओपनर

हंसल मेहता यांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांचही कौतुक केलं आहे. “अयान मुखर्जी, करण जोहर आणि नमित मल्होत्रा यांच्या चिकाटीवृत्तीचा मी आदर करतो. हा चित्रपट नक्कीच चांगली कामगिरी करेल”, असं म्हणत त्यांनी रणबीर आणि आलियाच्या कामाचंही कौतुक केलं आहे.

हेही वाचा >> ‘तारक मेहता का…’ मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री; ‘आश्रम ३’ फेम अभिनेता शैलेश लोढा यांच्या भूमिकेत दिसणार

‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. बॉयकॉटच्या ट्रेण्डमध्ये अडकल्यानंतरही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर १२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर वर्ल्ड वाइड २१० कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जून, अभिनेत्री मौनी रॉय अशी तगडी स्टार कास्ट आहे. 

Story img Loader