मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची काल औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला दिग्दर्शक केदार शिंदे(Kedar Shinde) आणि अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) यांनी देखील हजेरी लावली होती. पण त्यांच्या उपस्थितीतीच खास कारण होतं. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाच नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. तर राज ठाकरेंच्या उपस्थितीत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहीर साबळे हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात होते, तसेच मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक देखील समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीला समाजात ओळख मिळवून दिली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “ज्या प्रसिद्ध कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्रभरात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ द्वारे लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली, अशा कलाकाराच्या चित्रपटाची घोषणा मी महाराष्ट्र दिनी करीत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना शाहीर साबळेंच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय अतुल यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट करताना आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.”

आणखी वाचा : Lock Upp : “…तर देव तुला मूल कसं देईल”, पायल रोहतगीवर संतापलेल्या शिवम शर्माचं वादग्रस्त विधान

केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director kedar shinde announces a biopic on legendary shahir sable maharashtra shahir teaser released in the raj thackeray sabha dcp