लोककलेच्या माध्यमातून चले जाव चळवळीपासून ते हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा कित्येक सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेत समाजजागर करणाऱ्या शाहीर कृष्णराव साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष ३ सप्टेबर २०२२ पासून सुरू झाले आहे. यानिमित्ताने, शाहिरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाने पडद्यावर आणण्याचा ध्यास त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे. शाहिरांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातून त्यांची पणती आणि केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. शाहिरांच्या पत्नी भानुमती यांच्या भूमिकेतून सना प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘माझे वडील याच क्षेत्राशी संबंधित असल्याने लहानपणापासूनच मी अभिनय, कॅमेरा, कलाकार मंडळी या गोष्टी जवळून अनुभवल्या आहेत. मला स्वत:ला अभिनय क्षेत्रात यायची पहिल्यापासूनच इच्छा होती. मात्र जोपर्यंत आपल्याला कॅमेऱ्यामागचं विश्व, त्यामागची मेहनत लक्षात येत नाही तोवर कॅमेऱ्यासमोर अभिनय करणं योग्य होणार नाही हे माझं ठाम मत होतं. त्यामुळे गेली काही वर्ष मी वडिलांबरोबर मालिका आणि चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत तांत्रिक बाबी अभ्यासल्या. अभिनयावरही लक्ष केंद्रित केलं आहे’, असं सना सांगते. एक अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावरील पदार्पणासाठी भानुमती साबळे यांची भूमिका साकारायला मिळणं यासारखी सुवर्णसंधी असूच शकत नाही, असं सांगत याबाबतीत आपण भाग्यवान ठरलो आहोत, अशी भावना सनाने व्यक्त केली.
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या मुलीचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण
शाहिरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाने पडद्यावर आणण्याचा ध्यास त्यांचे नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतला आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2022 at 00:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director kedar shinde daughter debuts in the film industry amy