राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे. तर दुसरीकडे या राजकीय पेचप्रसंगावर अनेक कलाकार आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. ते नेहमी विविध मुद्यांवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नुकतंच केदार शिंदे यांनी एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.

“पण खंत एकच आहे की शिवसेनेचा…”, केदार शिंदे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

केदार शिंदे यांची पोस्ट

“तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला.. नाटक सुरू.. performance तोच!!!!”, असे केदार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर फक्त नाटक आता नटसम्राट करणार आहे, लक्षवेधी साधारण राहणीमान, उच्च विचार सरणीच्या नावशिक्याने उत्तम प्रयोग सादर केला आणि मने जिंकलीत, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने अखेर जय महाराष्ट्र….!!! असे कमेंट करताना म्हटले आहे.

“शाहीरांनी गायक म्हणून नावारुपास यावं यासाठी लतादीदीही आग्रही होत्या पण…”, केदार शिंदेंनी सांगितली भावूक आठवण

दरम्यान महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात शिवसेनेनं बंडखोर १६ आमदारांना निलंबित केल्याची याचिका न्यायप्रविष्ठ असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. या बहुमत चाचणीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने या प्रकरणामध्ये रात्री ९ वाजता निकाल देताना उद्याच बहुमत चाचणी होईल असं म्हटलं. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हवरुन राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

Story img Loader