मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच केदार शिंदेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी अभिनेत्री जॅझी बॅलेरीनी हिच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी या फोटोला एक हटके कॅप्शन दिले आहे. “मी या इंग्रज मुलीसोबत सध्या काम करतोय.. आपला देश आपली संस्कृती सोडून साता समुद्रापार आलेल्या मुलीसाठी, माझ्या सहीत सगळच नवं आहे. सध्या पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या धडे गिरवतोय. So now I can talk English, I can walk English.. because English is very funny language”, असे त्यांनी या पोस्टसोबत म्हटले आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
eknath shinde challenge to mahavikas aghadi,
“तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा”; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!

केदार शिंदेंनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केदार शिंदे हे अभिनेत्री जॅझी बॅलेरीनी हिच्यासोबत एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतानाही दिसत आहे.

कोण आहे जॅझी बॅलेरीनी?

जॅझी बॅलेरीनी ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सध्या पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने आतापर्यंत अनेक पंजाबी गाण्यात काम केले आहे. तिचा इन्स्टाग्रामवर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचा जन्म २३ एप्रिल २००० रोजी इंग्लंडमध्ये झाला आहे. ती सध्या चंदीगढमध्ये राहत आहेत.

तर केदार शिंदे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध आहे. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी अनेक नाटक त्यांनी केले आहेत. त्यासोबतच हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. त्यासोबच ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.