मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. केदार शिंदे आणि अंकुश चौधरी हे दोघेही एकमेकांचे फार जुने मित्र आहेत. अनेकदा ते एकमेकांबद्दलच्या आठवणी शेअर करत असतात. नुकतंच केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अंकुश चौधरीकडे पाहिले जाते. दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अंकुशने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा दगडी चाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याबरोबरच अंकुशची पत्नी दीपा परब ही तू चालं पुढं या मालिकेत झळकत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : ऐतिहासिक पात्र, बोल्ड फोटो अन् रोखठोक स्वभाव असलेल्या स्नेहलता वसईकरबद्दल माहितीये का?

Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना

केदारने इन्स्टाग्रामवर त्याच्या आगामी चित्रपटातील एक पोस्टर शेअर केले आहे. त्यात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या पोस्टरवर दीपा परब झळकताना दिसत आहे. या फोटोबरोबर त्याने एक हटके कॅप्शनही दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

केदार शिंदेंची पोस्ट

“दीपा परब-चौधरी वाढदिवस शुभेच्छा… तुला एवढ्या वर्षांत विविध भूमिकेत मी पाहतोय.. एक मित्र म्हणून कॉलेजच्या जमान्यापासून ते आत्ता माझ्या जीवलग मित्राची बायको, ते अगदी मी दिग्दर्शीत करत असताना एक अभिनेत्री.. सगळ्याच भुमिका तू मनापासून करतेयस.. माझ्या मित्राचा संसार सुखाचा करण्यात तुझा महत्त्वपुर्ण सहभाग आहे. आजच्या घडीला दिग्दर्शक म्हणून मी तुम्हा दोघांसोबत काम केलय करतोय..

धकाधकीत तू घेत असलेली प्रिन्स ची काळजी, त्याला संस्कारात परिपूर्ण करण्याच तुझं व्रत वाखाणण्याजोगं आहे. आपली बाईपण भारी देवा सिनेमा येईल तेव्हा एक वेगळी अभिनेत्री प्रेक्षकांना दिसेल याची मला खात्री आहे. आत्ता पुरतं एवढच…. तू चाल पुढं…”, असे केदार शिंदेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “…..ते सुद्धा गणरायाच्या आशीर्वादानेच” अंकुश चौधरीच्या पत्नीने सांगितला खास योगायोग

दरम्यान अंकुश चौधरीची पत्नी दीपा हिने नुकतंच छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Story img Loader