मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा तितकाच दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. ते लवकरच वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र नुकतंच त्यांच्या एका पोस्टने लक्ष वेधले आहे. महेश मांजरेकरांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यानिमित्ताने भावूक होत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

महेश मांजरेकरांनी इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना ते म्हणाले, “भावपूर्ण श्रद्धांजली रेखा अश्विन मेहता. मी आयुष्यात जे काही मिळवले त्यात तुझे योगदान मोठे आहे.”

महेश मांजरेकरांच्या या पोस्टनंतर त्यांचा मुलगा सत्य मांजरेकरनेही एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानेही रेखा मेहता यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला त्याने ‘RIP रेखा मम्मी’ असे कॅप्शन दिले आहे.

रेखा मेहता या मांजरेकर कुटुंबियांच्या जवळच्या असल्याचे या दोघांच्या पोस्टमधून स्पष्ट दिसत आहे. पण त्यांचे आणि मांजरेकर कुटुंबियांचे नेमके संबंध काय याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

महेश मांजरेकर आणि सत्य मांजरेकर यांनी केलेल्या या पोस्टवर अनेकांनी भावपूर्ण श्रद्धाजंली, RIP अशा कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी या कोण आहेत असा प्रश्न त्यांना विचारला आहे.

Story img Loader