‘हवाहवाई’ या आगामी मराठी चित्रपटाची  मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. ‘द ग्रेट इंडियन किचन’ या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा सजयन या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या ७ ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘वन रूम किचन’, ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटांनंतर महेश टिळेकर ‘हवाहवाई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय गृहिणीची संघर्षमय कथा घेऊन भेटीला येत आहेत. ‘मराठी तारका प्रॉडक्शन्स’ आणि ‘नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्स’चे विजय शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत. ‘हवाहवाई’ चित्रपटातील एक गाणं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं आहे.

Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो

हेही वाचा >> पूर्वाश्रमीचा पती अन् बॉयफ्रेंडसह एकाच शोमध्ये दिसणार मलायका अरोरा; वाचा नेमकं काय घडणार?

‘हवाहवाई’ चित्रपटाची कथा मध्यमवर्गीय गृहिणीचा स्वप्नपूर्तीकडे होणाऱ्या संघर्षमय प्रवासावर आधारित आहे. चैनीत राहता आलं नाही तरी चालेल पण आयुष्य सुखाने जगता आलं पाहिजे, ही भावना चित्रपटातील नायिकेची आहे. आयुष्यात आलेल्या एका संकटामुळे चित्रपटातील नायिका घरसंसार सांभाळून फूडस्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेते, असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री दाक्षिणात्य निमिषा सजयनने चित्रपटात ज्योती ही मुख्य भूमिका साकारली आहे. सामान्य गृहिणी असलेल्या ज्योतीच्या ध्येयपूर्तीचा प्रवास नेमका कोणत्या वळणावर जातो, हे बघणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा >> “चित्रपट पाहायला एलियन्स…”, ‘ब्रह्मास्र’च्या यशावरून केआरकेनं केलेलं ट्वीट चर्चेत

‘हवाहवाई’  चित्रपटात अभिनेत्री निमिषा सजयनबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे,विजय आंदळकर, अंकित मोहन या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader