नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट चांगला लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. मात्र करोनामुळे चित्रपटाची निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती नागराज मंजुळेंनी दिली आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जिनिलिया देशमुख दोघे मिळून शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. दोन वर्षांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत होती.
या चित्रपटाच्या टीझरमध्ये हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र करोना साथीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. नुकतंच नागराज मंजुळे हे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले, “करोना या साथीच्या रोगामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यात आम्हाला दोन वर्षे गमवावी लागली. ज्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या या चित्रपटाचे काम करता आले नाही. पण हा चित्रपट रखडला असे आपण बोलू शकत नाही.”
“हा एक अत्यंत उत्कृष्ट प्रकल्प आहे. या चित्रपटाबद्दल तुमच्याइतकाच मी देखील उत्सुक आहे आणि याबाबत सर्व काही व्यवस्थित झाले की तुम्हाला याची माहिती देईन. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची निर्मिती करणे हे आव्हानात्मक असेल. हा चित्रपट ऐतिहासिक आहे. पण शेवटी आम्ही एका चित्रपटाची निर्मिती करत आहोत आणि चित्रपटाच्या निर्मितीचे नियम बदलत नाही. फक्त विषय बदलतात आणि अर्थातच चित्रपटाच्या स्वरुपात एक आव्हान समोर येतं”, असेही ते म्हणाले.
“मी जेव्हा लहान होतो तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट किती छान होईल, याचा विचार करायचो. मी त्यांच्यावर निर्मित झालेले दोन चित्रपट पाहिले आणि आता मला ते स्वत: बनवायचे आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे”, असेही त्यांनी सांगितले.
‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “नागराज मंजुळे हे…”
दरम्यान अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘शिवत्रयी’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. तर या भव्य अशा चित्रपटाला संगीत देण्याची धुरा अर्थातच अजय-अतुल यांना सोपावण्यात आली आहे. ‘शिवत्रयी’ नावावरून हा एकच चित्रपट नसून तीन चित्रपटांची सीरिज असणार आहे,