नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ‘झुंड’ या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकारांनी कौतुकही केले होते. दरम्यान झुंडच्या या अभूतपूर्व यशानंतर नुकतंच नागपूरकरांनी नागराज मंजुळेंचा सत्कार केला. यावेळी नागराज मंजुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झुंड या चित्रपटाचे संपूर्ण शूटींग हे नागपुरात झाले आहे. तसेच या चित्रपटात झळकलेली सर्व मुलेही नागपूरच्या झोपडपट्टीत राहणारी आहेत. यामुळेच बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर नागपुरातील संयुक्त महिला सत्कार समितीच्या वतीने नागराज मंजुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. झुंड चित्रपटाच्या निमित्ताने समाजातील वास्तव व नागपूरकर कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल संयुक्त महिला सत्कार समितीने नागराज मंजुळेंचे आभार व्यक्त केले.

‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर किरण मानेंची फेसबुक पोस्ट, म्हणाले “नागराज तू…”

यावेळी मनोगत व्यक्त करताना नागराज मंजुळे म्हणाले, “अनेक महिलांनी मिळून माझा सत्कार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नागपूरकर भगिनींनी हारतुरे देऊन केलेले कौतुक आणि पाठीवर ठेवलेला हात सदैव आठवणीत राहणारा आहे.”

“आयुष्यात आतापर्यंत मला अनेक मानसन्मान मिळाले, सत्कारही खूप झालेत. मात्र, नागपूरकर भगिनींनी माझा केलेला हा सत्कार लई भारी आणि मरेपर्यंत आठवणीत राहणारा आहे”, असेही नागराज मंजुळेंनी सांगितले.

‘झुंड’वरुन होणाऱ्या टीकांवर नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले “जर तक्रार असेल तर…”

यावेळी त्यांनी झुंड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नागपुरात घडलेले किस्से आणि आठवणींना उजाळा दिला. तसेच चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या अभिनयाची स्तुतीही केली. नागपूरची ही मुले स्टार आहेत. भविष्यात ही मोठी होऊन शहराचे नाव कमावतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच जर भविष्यात पुन्हा संधी मिळाली, तर मी नागपुरात पुन्हा शूटिंग करेन, असेही नागराज मंजुळेंनी सांगितले.

 ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director nagraj manjule talk about shooting again in nagpur after felicitated by people nrp