दिग्दर्शक आणि अभिनेते प्रकाश झा यांनी अलीकडेच ‘लाल सिंग चड्ढा’च्या निमित्ताने बॉलीवूडकरांवर टीका केली होती आणि ते अतिशय निकृष्ट चित्रपट बनवत असल्याचे म्हटले होते. कथा नसेल तर बॉलिवूडने चित्रपट निर्मिती करणं बंद करावं, असंही प्रकाश झा म्हणाले होते. आता प्रकाश झा यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या बॉयकॉट मोहिमेमुळे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी आहेत. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास निर्माते घाबरतात. मात्र प्रकाश झा यांना याची भीती वाटत नाही. बॉलिवूड स्टार्सचे सिनेमे फ्लॉप होत असल्याचंही त्यांना आश्चर्य वाटत नाही.

नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत प्रकाश झा यांनी बॉलिवूड कलाकरांवर टीका केली. ते म्हणाले, “चित्रपट कलाकार आता पान-गुटखा विकतात आणि जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्यात ते रिमेक बनवतात. अशा परिस्थितीत त्यांचे चित्रपट फ्लॉप होण्याचे दुसरे कारण असू शकत नाही.” प्रकाश झा यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं. जेव्हा प्रकाश झा यांना बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा, ‘बॉलिवूड स्टार्स आजकाल गुटखा विकतात आणि जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते रिमेक किंवा पूर्णपणे हास्यास्पद चित्रपट बनवतात. त्यांचे पाच-सहा चित्रपट फ्लॉप झाले तरी त्यांना त्याची पर्वा नाही.” असं म्हणत त्यांनी कोणाचंही नाव न घेता पान मसाल्याची जाहीरात करणाऱ्या कलाकारांवर टीका केली.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
kangana rananut call vikrant massey cockroach
एकेकाळी ज्याला म्हटलं ‘झुरळ’, आता त्याच अभिनेत्याच्या चित्रपटाचं खासदार कंगना रणौत यांनी केलं कौतुक; म्हणाल्या…

आणखी वाचा-“काल पहाटे लंडनसाठी निघालो अन्…” संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

अक्षय कुमारचे या वर्षी प्रदर्शित झालेले तीन चित्रपट सलग फ्लॉप ठरले. यानंतर त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘कटपुतली’ हा चौथा चित्रपट प्रदर्शित केला. हा चित्रपट साऊथच्या ‘राक्षसन’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अलिकडेच आमिर खानही ‘लाल सिंह चड्ढा’ या ‘फॉरेस्ट गंप’च्या हिंदी रिमेकमध्येही दिसला. हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाद्वारे आमिरने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते.

आणखी वाचा- “तुमच्याकडे कथा नसेल तर… ” लाल सिंग चड्ढा चित्रपटावर दिग्दर्शक प्रकाश झा यांची टीका

प्रकाश झा यांना सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की चित्रपट निर्माते आणि लेखकांनाही आता असे वाटू लागले आहे की ते नावाजलेल्या कलाकारांच्या मदतीने त्यांचे चित्रपट हिट करू शकतात. प्रकाश झा यांच्या म्हणण्यानुसार, “चित्रपटसृष्टीने आता या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ज्या जनतेने त्यांना स्टार बनवले आहे आणि एक दिवस ही जनता त्यांना बुडवेल हे कलाकारांनाही समजले पाहिजे.”

Story img Loader