विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकीकडे अमृता खानविलकरचे या भूमिकेसाठी कौतुक होत असताना दुसरीकडे अभिनेत्री मानसी नाईकच्या दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. नुकतंच या संपूर्ण वादावर चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी या चित्रपटाची प्रमुख भूमिकेसाठी विविध अभिनेत्रींची नावे समोर येत होती. मानसी नाईक, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, पुजा सावंत यांसह मराठीतील विविध प्रसिद्ध अभिनेत्रींच्या नावांची चर्चा रंगली होती. त्यातच अभिनेत्री मानसी नाईक हिने मला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती असे सांगितले आहे. त्यासोबतच मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती असेही तिने म्हटले होते. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा

मात्र दिग्दर्शक प्रसाद ओक याने या सर्व अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी अमृता खानविलकरचे नाव ठरले होते, असे सांगत त्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो चित्रपटाविषयी बातचीत करताना दिसत आहे.

“मी जेव्हा चंद्रमुखी हा चित्रपट करायचे ठरवले तेव्हा लावणी या लोककलेला जागतिक पातळीवर न्यायचे ठरवले. मी जेव्हा या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विचार करत होतो, तेव्हापासून दिग्दर्शक म्हणून माझ्या डोक्यात फक्त अमृता खानविलकर हिचेच नाव होते. मी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीचा विचारही केला नाही”, असे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले.

“अमृताला अभिनय आणि नृत्य या दोन्हीही कला उत्तम अवगत आहेत. ती चंद्रमुखीला योग्य न्याय देईल, असा मला विश्वास होता. विशेष म्हणजे या व्यक्तीरेखेसाठी अमृताने पाच ते सात किलो वजन वाढवलं. त्या काळात लावणी कलावंत या झिरोफिगर नसायच्या. तसेच लावणी करणाऱ्या नृत्यांगना या नऊवारी साडी नेसतात. त्या जर भरीव बांध्याच्या असतील तरच त्या चांगल्या दिसतात. त्यामुळे अमृताने वजन वाढवण्यावर खूप मेहनत घेतली”, असेही त्याने म्हटले.

“विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये चित्रपटाचे शूटींग थांबले होते. मात्र त्यावेळेतही अमृताने तिच्या वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवले. त्यामुळे अमृता हीच माझ्या डोक्यातील चंद्रमुखी होती. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना जर कोणी मी ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारली असती, असं कोणी म्हणत असेल तर मग तो विषय वेळीच थांबायला हवा”, असेही प्रसाद ओकने सांगितले.

“…ती आता तुमच्यासमोर अवतरली आहे”, ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ साकारणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.