विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्यानंतर हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. नुकतंच या प्रश्नाचे उत्तर समोर आलं आहे.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना पाहायला मिळत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा ही भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारताना दिसणार आहे. तिने स्वत: पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
Mayuri Deshmukh
“तर ते अत्यंत धोकादायक…”, लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख सोशल मीडियाच्या वापराबाबत म्हणाली…
maharashtrachi hasya jatra new actress Ashwini kasar entry
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री! सेटवरचा फोटो शेअर करत म्हणाली, “मला सांभाळून घेतल्याबद्दल…”

अमृता खानविलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने चंद्रमुखी चित्रपटातील नवे पोस्टर शेअर केले आहे. यात ती स्वत: एका नृत्यांगनेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या कॅप्शन देताना अमृता खानविलकर म्हणाली, “चंद्रा नक्की कोण? ती दिसते कशी? ती हसते कशी? जिच्या दिलखेचक अदांसाठी तुम्ही आतुर होता, ती चंद्रा आता तुमच्या समोर अवतरली आहे.”

“ढोलकीच्या तालात, घुंगरांची साथ घेऊन, तुम्हा रसिकांच्या टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात मी चंद्रा तुमच्या समोर आले आहे. मी आले आहे तुमचं मनोरंजन करायला, तुम्हाला प्रेमाची नवी व्याख्या सांगायला आणि लावणीच्या ठेक्यात मनमुराद नाचवायला…तर मग तयार आहात ना?” असा प्रश्नही अमृताने विचारला आहे.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

Story img Loader