वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट मराठीत तयार होत असून मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन यात अमराठी मंडळीही येत आहेत. याच परंपरेत आता बॉलिवूडमधील गाजलेल्या ‘भेजा फ्राय’ या चित्रपटाचा दिग्दर्शक सागर बल्लारी पदार्पण करत आहे. सागर बल्लारी याची निर्मिती असलेला ‘भातुकली’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अजिंक्य देव, शिल्पा तुळसकर, सुनील बर्वे, स्मिता तळवलकर, किरण करमरकर आदी कलाकार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जोशी यांचे आहे. हा चित्रपट १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2014 रोजी प्रकाशित
‘भेजा फ्राय’चा दिग्दर्शक सागर बल्लारी आता मराठीत!
वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट मराठीत तयार होत असून मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन यात अमराठी मंडळीही येत आहेत.
First published on: 25-05-2014 at 04:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director sagar ballary to turn producer with marathi film