Pushpa 2: The Rule : सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच चाहते ‘पुष्पा २’ चित्रपटाची वाट पाहत होते. ‘पुष्पा २: द रुल’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट ५ डिसेंबरला चित्रपटगृहात पाहता येणार आहे. अशात चाहते या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत.
नुकतीच चित्रपटाच्या कामाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचे एडिटिंगचे काही काम शिल्लक होते. हे सर्व काम आता पूर्ण झाले असून, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी पूर्णतः तयार झाला आहे. पुष्पाच्या निर्मात्यांनी एक्स पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. निर्मात्यांनी नुकतेच दिग्दर्शक सुकुमार आणि एडिटर नवीन नूली यांचे पडद्यामागील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये चित्रपटाच्या शेवटच्या एडिटिंगच्या कामाची झलकसुद्धा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : लग्नानंतर ९ वर्षांनी झाली आई, प्रसिद्ध अभिनेत्रीने लाडक्या लेकीचं नाव ठेवलं ‘लीला’
निर्मात्यांनी हे फोटो पोस्ट करत यावर कॅप्शनमध्ये लिहिलं की, “सर्व तयारी झाली आहे, सुकुमार यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट तुम्हाला रोमांचक अनुभव नक्की देईल. सर्वात मोठा भारतीय चित्रपट तुम्हाला एक छान अनुभव देण्यासाठी पूर्णत: तयार झाला आहे. ५ डिसेंबरला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.”
चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख आता जवळ आली आहे, त्यामुळे रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन दोन्ही कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशच्या कामात व्यग्र आहेत. पटनामध्ये चित्रपटाच्या कामाचा शुभारंभ झाला, त्यानंतर याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. आता चित्रपटाचं सर्व काम पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांकडूनदेखील प्रमोशन केले जाणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचलेली असताना निर्मात्यांकडून बंगळुरू, मुंबई आणि हैदराबादमध्येसुद्धा प्रमोशन केले जाणार आहे.


हेही वाचा : अखेर रेश्मा शिंदेच्या होणाऱ्या नवऱ्याचा पहिला फोटो आला समोर; त्याचं नाव काय? हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाची आतापर्यंत तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. सुरुवातीला ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘सुसेकी’ ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली, तर नुकतंच या चित्रपटाचं आयटम साँग ‘किसिक’ प्रदर्शित झालं आहे. या आयटम साँगमध्ये समांथा प्रभूऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला झळकली आहे. गाण्यात लीला आणि अल्लू अर्जुन यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे; तर आधीच्या ‘सुसेकी’ म्हणजेच ‘अंगारो’ गाण्यात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची प्रेमकहाणी दिसली आहे.