‘द कपिल शर्मा शो’ हा विनोदी कार्यक्रम आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडचे सेलिब्रिटी येऊन आपल्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे प्रमोशन करतात. परंतु कपिल शर्मा शो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मा आणि त्यांच्या शोच्या निर्मात्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत.
विवेक यांनी सांगितले की त्यांचा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये मोठे कलाकार नाही. याच कारणामुळे त्यांना कपिलच्या शोमध्ये येऊन प्रमोशन करण्यापासून अडवण्यात आले आहे. खरंतर, एका युजरने ट्विटरवर विवेक यांना टॅग करत विचारले, “विवेक सर, कपिल शर्माच्या शोमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करणे आवश्यक आहे. तुम्ही सर्वाना सहकार्य केले आहे. कृपया या चित्रपटाचेही प्रमोशन करा. आम्हाला मिथुन दा, अनुपम खेर यांना एकत्र बघायचे आहे. धन्यवाद!’
International Women’s Day 2022 : राझी ते छपाक; महिला सक्षमीकरणावर आधारित बॉलिवूड चित्रपट
या ट्विटवर उत्तर देताना विवेक म्हणाले की, ‘द कपिल शर्मा शोमध्ये कोणाला आमंत्रित करावे हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. जोपर्यंत बॉलीवूडचा संबंध आहे, एकदा मिस्टर बच्चन गांधी कुटुंबासाठी म्हणाले होते – ‘वो राजा हैं हम रंक’.
यापूर्वी विवेक अग्निहोत्रीने एका ट्विटमध्ये सांगितले होते की, तो स्वत: कपिल शर्माच्या शोचा मोठा चाहता आहे पण त्याला या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यांनी लिहिले की, मी देखील त्यांचा चाहता आहे, पण वस्तूस्थिती अशी आहे की आमच्या चित्रपटात एकही मोठा स्टार नसल्याने त्यांनी आम्हाला त्यांच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. बॉलीवूडमधील मोठे सेलिब्रेटी किंवा कलाकार यांच्याव्यतिरिक्त इतर लेखक, चांगले अभिनेते यांना कोणी विचारत नाही. विवेकच्या या आरोपांनंतर अनेक युजर्सनी कपिल शर्माला ट्रोल केले.
‘बच्चन पांडे’ चित्रपतील ‘सारे बोलो बेवफ़ा’ गाणं झालं रिलीज; अक्षय कुमारचा स्वॅग ठरतोय चर्चेचा विषय
विशेष म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून त्याला खूप पसंती मिळाली आहे. या चित्रपटात ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या याबद्दल सांगण्यात आले आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, अनुपम खेर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.