बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकीकडे दिशाच्या या चित्रपटाची सोशल मीडयावर चर्चा असताना तिचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. दिशा पाटनी मागच्या काही वर्षांपासून अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत होती. अर्थात या दोघांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे बोलणं नेहमीच टाळलं होतं. पण बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये तसेच कार्यक्रमात दोघंही नेहमीच एकत्र दिसले होते. आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत.
दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांनी २०२२ च्या सुरुवातीलाच वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता असं बोललं जात आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृतानुसार, टायगर आणि दिशा यांचा ब्रेकअप झालं असून मागच्या वर्षभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होते. टायगरच्या एका जवळच्या मित्रानं याबद्दल बोलताना सांगितलं, “मला याबद्दल मागच्याच आठवड्यात समजलं. टायगरनं कोणत्याही मित्रासोबत ब्रेकअपबद्दल चर्चा केलेली नाही. तो फक्त त्याच्या कामावर फोकस करत आहे. या ब्रेकअपमुळे त्याच्या कामावर परिणाम होऊ नये याची तो पूर्ण काळजी घेत आहे.”
आणखी वाचा- दिशा पाटनीनं केली लिप्स सर्जरी? टायगरच्या Heropanti 2 पेक्षा गर्लफ्रेंडचीच चर्चा
दरम्यान दिशा पाटनी किंवा टायगर श्रॉफनं या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या वृत्ताची पुष्टी झालेली नाही. तसं पाहायला गेलं तर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा याआधीही झालेल्या आहेत. या दोघांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा अनेकदा ट्रेंडिंगमध्ये असतात. आताही दोघांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकांच्या आगामी चित्रपटांसाठी शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.
दिशाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिची मुख्य भूमिका असलेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर टायगरनं काही दिवसांपूर्वीच ‘स्क्रू ढीला’ चित्रपटाची घोषणा केली आहे.