गेल्या अडीच- तीन महिन्यांपासून देशावर करोनाचं सावट आहे. आतापर्यंत सामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यातच आता अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांनादेखील करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिशा पटानीचे वडील जगदीश पटानी यांना करोनाची लागण झाली आहे. ५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश वीज वितरण कार्यालयातील अतिरिक्त सीएमओ अशोक कुमार यांनी ही माहिती दिली. त्यांच्यासोबत अन्य दोन कर्मचाऱ्यांचीही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

जगदीश पटानी हे राज्य वीजवितरण विभागात डेप्युटी एसपी आहेत. काही दिवसांपूर्वी ते ट्रान्सफॉर्मर घोटाळ्याच्या चौकशीसाठी लखनौवरुन आले होते. तेव्हा त्यांची करोना चाचणी केल्यावर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांना ४८ तास क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत अन्य दोन अधिकारीही करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


दरम्यान, आतापर्यंत बॉलिवूडमधील काही कलाकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी करोनावर मात केली असून ते घरी परतले आहेत.