अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. त्याचसोबत दिशा तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. वर्कआउट करतानाचे किंवा तिच्या ट्रेनिंगचे विविध व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. दिशा ही अभिनयासह मार्शल आर्टसमध्येही तज्ज्ञ आहे. दिशाला उत्तम अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत ओळखले जाते. पण दिशाने कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिलेले नाही. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबाबतची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच बाझार इंडिया या वेबसाईटला दिशाने मुलाखत दिली. यावेळी तिने कॉलेजपासून अभिनेत्री बनण्यापर्यंतचा अनेक खुलासे केले आहे. या मुलाखतीदरम्यान दिशा म्हणाली, “मी कधीही अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. त्याउलट मला एअरफोर्समध्ये पायलट व्हायचे होते. विशेष म्हणजे मी इंजिनिअरिंगही करत होती. एकदा लखनौमध्ये कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मित्राने मला मॉडेलिंग स्पर्धेबद्दल सांगितले. त्यावेळी ते त्या सर्व विजेत्यांना मुंबईत घेऊन जाणार होते. पण कोणालाही मुंबईत जायचे नव्हते. मी अर्ज केला आणि ती २०१३ ला स्पर्धा जिंकली.”

“यावेळी एका मॉडेलिंग एजन्सीने पाहिले. पण मॉडेलिंग करत असताना मी माझ्या महाविद्यालयातील किमान उपस्थिती पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे मी रॅम्पवर चालणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मला स्वतंत्र होण्याची, स्वत:साठी कमवण्याची आणि कुटुंबावर अवलंबून न राहण्याची सवय झाली. लहान असताना माझे फारसे मित्र नव्हते. मी एखाद्याशी बोलतानाही फार लाजायची. मी अजूनही तशीच आहे. फक्त माझ्यातील आत्मविश्वास अधिक वाढला आहे,” असेही दिशाने सांगितले.

“त्यामुळे मी चित्रपट क्षेत्रात आहे याची कल्पना करणे अनेकांसाठी कठीण आहे. पण अभिनेता किंवा अभिनेत्री असणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच सामाजिक राहावे. याऐवजी तुम्ही स्वतःसाठी असणं आणि जे तुम्हाला आरामदायी वाटेल, जे योग्य वाटेल ते करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी देखील तुमच्या आजूबाजूला असलेल्या मुलींपैकी एक आहे,” असेही ती म्हणाली.

दिशा पाटनीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता आगामी काळात ‘योद्धा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोघंही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani reveals it was not her dream to become an actor i wanted to be an air force pilot nrp