अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच तिच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलंय. दिशा पाटनीनं नुकताच शेअर केलेला एक बिकिनी फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

दिशा पाटनीनं इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमधील दिशाचा बिकिनी लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये दिशा बिकिनीमध्ये मालदिवच्या समुद्र किनाऱ्यावर उभी असलेली दिसत आहे.
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील सोनूने दिली प्रेमाची कबुली, तिच्या बॉयफ्रेंडला पाहिलेत का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दिशाचा हॉट लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. दिशानं इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलेला दिसत आहे. या फोटोमध्ये दिशाचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी तिचा हॉट लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

दिशा पाटनीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता आगामी काळात ‘योद्धा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोघंही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Story img Loader