बॉलिवूड अभिनेत्री सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. चित्रपटापेक्षा त्या कोणाबरोबर डेट करत आहेत तसेच त्यांनी परिधान केलेल्या फोटोमुळे ट्रोलदेखील होत असतात. दिशा पटानी हे त्यातील एक नाव आहे. भिनेता टायगर श्रॉफ बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ती सध्या तिच्या मित्राला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र सध्या दिशा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे ते कारण म्हणजे तिचा ड्रेस, ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
दिशा सोशल मीडियावर सक्रीय असते. बोल्ड लूकमुळे ती कायम चर्चेत असते. मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिशाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने एक पांढरी स्लिंग बॅग घेतली होती. तसेच हातात पांढऱ्या रंगाचे जाकीट धरलेले होते, लाल ब्रालेट टॉप आणि डेनिम शॉर्ट्स असा तिचा लूक होता.
“त्याचं उद्धट वागणं…” अभिषेक बच्चनच्या वर्तनावर अनुराग कश्यपचा मोठा खुलासा
दिशाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहले आहे, “हिला कोणीतरी चांगले कपडे द्या,” तर दुसऱ्याने लिहले आहे, “तुमची फिगर दाखवण्यासाठी तुम्हाला नग्न असण्याची गरज नाही, तुम्ही सभ्य कपडे घालूनही ते दाखवू शकता” अशा शब्दात सुनावले आहे. एकाने लिहले की “ही महागडी उर्फी आहे.”
दिशा पटानी अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमबरोबर ‘एक व्हिलन २’मध्ये दिसली होती. आता ती ‘योद्धा’ आणि ‘किक २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.