आजकाल ओटीटीचा खूप ट्रेंड आहे. वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित कलाकृती ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत असतात. काही वर्षांपूर्वी महाभारत हे टीव्हीवर प्रचंड गाजलं. कोरोना काळातदेखील ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना टीव्हीवर बघायला मिळाली. आता तोच भव्य इतिहास आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

हेही वाचा : “अयान मुखर्जीला हुशार म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे…” ‘ब्रम्हास्त्र’वर कंगनाची आगपाखड

लवकरच महाभारतावरील आंतरराष्ट्रीय वेब सिरीज पाहायला मिळणार आहे.  अलीकडेच, महाभारताच्या निर्मात्यांनी वेब सीरिजचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित केली आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून महाभारताचे पोस्टर्स शेअर केले आहेत. इंटरनॅशनल कंटेंटचे कंटेंट हेड गौरव बॅनर्जी, प्रोड्युसर मधु मंटेना आणि डिस्नी प्लस हॉटस्टारचे अध्यक्ष रेबेका कॅम्पबेल यांनी ही घोषणा केली आहे. 

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या सत्रात महाभारताची घोषणा करण्यात आली आहे. या वेब सिरीजची कथा पूर्णपणे महाभारतावर आधारित असणार आहे. या वेब सिरिजमध्ये सत्य आणि असत्य यांच्यातील मोठा संघर्ष पाहायला मिळेल.

आणखी वाचा : ‘पुष्पा २’मध्ये लागली ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनबरोबर

याबद्दल गौरव बॅनर्जी म्हणाले की, “आम्ही महाभारताची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करणार आहोत.  यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, मधु मंटेना ही आमची सहनिर्माती आहे. ती या भव्य वेब सिरिजसाठी एक उत्तम टीम तयार करत आहे. तसेच आम्ही लवकरच पात्रांसाठी कास्टिंग सुरू करणार आहोत. महाभारताची कथा खूप मनोरंजक आहे. त्यात जबरदस्त अॅक्शन आहे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.” या सिरिजचे पोस्टर पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या पोस्टवर कमेंट करत सर्वजण या सिरिजसाठी उत्सुक असल्याचे सांगत आहेत.

Story img Loader