डिस्नी यूटीव्ही स्टुडिओने त्याच्या ४२ यशस्वी चित्रपटांचे पोस्टर्स ऑनलाइन उपलब्ध करुन दिले आहे. ‘रंग दे बसंती’, ‘डेव डी’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘बर्फी’, ‘पानसिंग तोमर’ आणि अन्य काही चित्रपटांच्या पोस्टर्सचा यामध्ये समावेश आहे.
माझ्या चित्रपटाचा पोस्टर पाहून मी खूप आनंदी झालो, असे राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले. तसेच, दिग्दर्शक अनुराग बसू म्हणाला की, ‘बर्फी’ला जागतिक आणि राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे तसेच त्याचे पोस्टरही ऑनलाइन उपलब्ध होत आहेत, यामुळे मी खुश आहे. ही एक चांगली योजना असून सर्व चित्रपटप्रेमींना याचा भाग होण्याची संधी प्राप्त होत आहे.

Story img Loader