प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल मागच्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच दिव्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंड वरुण सूदसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर या दोघांचं ब्रेकअप का झालं हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक होते. अर्थात याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र ब्रेकअपनंतर वरुण सूदचं नाव अभिनेत्री मधुरीमा रॉयसोबत जोडलं जातंय एवढंच नाही तर दिव्या आणि वरुणच्या ब्रेकअपलाही तीच जबाबदार असल्याचं बोललं जातंय. आता या सर्व चर्चांवर दिव्या अग्रवालनं प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरूण सूद आणि दिव्या अग्रवाल याचं ब्रेकअप झाल्यानंतर काही लोकांनी वरुणच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मधुरीमासोबत अफेअर असल्यानं त्याने दिव्याला फसवलं असं बोललं जात आहे. वरुण सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जो मधुरीमानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. मधुरीमानं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरुण आणि मधुरीमाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आणखी वाचा- कथित गर्लफ्रेंड सबा अझादच्या व्हिडीओवर हृतिक रोशनची फ्लर्टी कमेंट, म्हणाला…

दिव्या अग्रवालनं नुकतंच या सर्व गोष्टींवर मौन सोडलं आहे. तिनं ट्विटर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिव्यानं लिहिलं, ‘खबरदार जर कोणी वरुणच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर. प्रत्येक व्यक्तीचा ब्रेकअप हा दुसऱ्या अफेअरमुळे होत नाही. तो चुकीचा नाहीये. तो खूप प्रामाणिक व्यक्ती आहे. एकटं राहण्याचा निर्णय हा माझा आहे त्यामुळे वरुणला काही बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. अशा अफवा पसरवणं बंद करा.’

आणखी वाचा- नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड

दरम्यान वरुण आणि दिव्या यांची लव्हस्टोरी रिअलिटी शो ‘एस ऑफ स्पेस’मधून सुरू झाली होती. या शोमध्ये वरुण पाहता क्षणी दिव्याच्या प्रेमात पडला होता आणि याच शोमध्ये त्यानं तिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. येत्या काही काळात हे दोघं लग्न करतील अशा देखील चर्चा होत्या. मात्र त्याआधीच दोघांचं ब्रेकअप झालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divya agrawal reacts on rumors of varun sood and madhurima roy affair mrj